Actress Sonam Kapoor Got Trolled Over Her Tween On Sushant Singh Rajput Suicide | Sushant Singh Rajput Death

सुशांत सिंहच्या मृत्यूमुळे प्रत्येक जण दु:ख व्यक्त करत आहे. सुशांतच्या आत्महत्येसाठी गर्लफ्रेण्ड, एक्स गर्लफ्रेण्डला दोषी ठरवणाऱ्यांना उद्देशून सोनम कपूरने ट्वीट केलं. या ट्वीटमुळे तिला टीकेचा सामना करावा लागत आहे. नेटिझन्सनी तिला ट्रोल केलंच पण ज्ञान वाढवण्याचा सल्लाही दिला.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत रविवारी (13 जून) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूमुळे प्रत्येक जण दु:ख व्यक्त करत आहे. बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. मात्र यातच अभिनेत्री सोनम कपूरला तिच्या एका ट्वीटमुळे टीकेचा सामना करावा लागत आहे. नेटिझन्सनी तिला ट्रोल केलंच पण ज्ञान वाढवण्याचा सल्लाही दिला.

सुशांत सिंह राजपूतने नैराश्येतून आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. मागील पाच ते सहा महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. शिवाय त्याची कथित गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीसोबतचं नातं बिघडल्यामुळे त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं का अशीही चर्चा सुरु आहे. यावरुनच सोनम कपूरने सोमवारी (15 जून) ट्वीट केलं आहे.

“एखाद्याच्या मृत्यूसाठी त्याची गर्लफ्रेण्ड, एक्स गर्लफ्रेण्ड, कुटुंब, सहकाऱ्यांना दोष देणं अज्ञान आहे,” असं सोनम कपूरने ट्वीटमध्ये म्हटलं होतं. यानंतर नेटिझन्सनी तिला चांगलंच फैलावर घेतलं. “सोनम कपूर कोण आहे? तिने सुशांतपेक्षा जास्त स्ट्रगल केला होता का? ही तीच मुलगी आहे की जिने टॅलेण्टेड ऐश्वर्याला आंटी म्हटलं होतं?” “बिघडलेली मुलगी.” “हिला मुख्य मुद्दा माहित नाही आणि ज्ञानही नाही आणि तोंडपाठ केलेलं ज्ञान वाटायला आली,” असे ट्वीट काहींनी केले आहेत. याशिवाय अनेकांनी नेपोटिझमवरुनही ट्वीट केले आहेत.

रिया चक्रवर्तीसोबत कथित नातं

सुशांत त्याच्या अभिनयासोबतच लव्ह लाईफमुळेही कायम चर्चेत असायचा. पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या अंकिता लोखंडेसोबत तो अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. परंतु ब्रेकअपनंतर सुशांतचं क्रिती सेननसोबतही जोडलं गेलं होतं. यानंतर सुशात रिया चक्रवर्तीसोबत कथित रिलेशनशिपमध्ये होता. अनेक दिवसांपासून रिया सुशांतसोबतच राहत होती. यादरम्यान त्यांच्यात बिनसलं आणि रियाने सुशांतचं घर सोडलं, असं म्हटलं जात होतं.

सुशांत सिंहचं करिअर

‘पवित्रा रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 2013 मध्ये ‘काय पो छे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने आपल्या करिअरमध्ये शुद्ध देसी रोमांस, पीके, एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ आणि छिछोरे यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा आगामी ‘दिल बेचारा’ हा चित्रपटही प्रदर्शनासाठी जवळपास तयार आहे.

रिया चक्रवर्तीची चौकशी होणार?

दरम्यान लॉकडाऊनच्या काळात रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतसोबत राहत होती. शिवाय सुशांतच्या आत्महत्येच्या एक-दोन दिवस आधीच ती सुशांतचं घर सोडून गेली होती. त्यामुळे त्याच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस आता रियाची चौकशी करण्याची शक्यता आहे. पोलीस लवकरच रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवून घेणार आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *