Comedian Bharti Singh Struggled Alot In Her Life, Know Her Lifes Interesting Facts

मुंबई : ड्रग्ज प्रकरणामुळे सध्या कॉमेडियन भारती चर्चेत आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) भारतीच्या घरावर छापा टाकला. भारतीच्या घरी एनसीबीला गांजा मिळाल्याचे वृत्त आहे. ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर भारतीला अटक करण्यात आली आहे. आज इंडस्ट्रीत अव्वल कॉमेडियन म्हणून यशाच्या शिखरावर पोहोचलेली भारतीचं बालपण खूप गरिबीत गेलं आहे. वडिलांचे निधन झाले तेव्हा भारती अवघ्या 2 वर्षांची होती.

एका मुलाखतीदरम्यान, तिच्या बालपणाबद्दल बोलताना भारती म्हणाली, “मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असून आम्ही चार भावंडे आहोत.” माझ्या आईचे वयाच्या 17 व्या वर्षी लग्न झालं. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, वयाच्या 23 व्या वर्षापर्यंत तिच्या पदरात तीन मुलं होती.

भारतीचं बालपण खूप हालाखीत गेलं आहे. याबद्दल सांगताना भारती एकदा म्हणाली होती, की “माझा मोठा भाऊ आणि बहिणीचा बहुतेक वेळ आमच्यासाठी अन्न आणि डोक्यावर छप्पर शोधण्यावरचं जात होता. बऱ्याचवेळा तर उपाशीपोटीचं झोपावं लागत असे.

ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगला अटक, एनसीबीकडून पती हर्ष याची चौकशी सुरूच

ते म्हणतात ना प्रत्येकाची वेळ येते. 2018 मध्ये आलेल्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या चौथ्या सत्राने भारतीचे नशिब पालटले. या शोमध्ये भारतीने ‘लल्ली’ नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. या पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि इथूनच भारती कॉमेडी क्वीन झाली.

कधीकाळी उपाशीपोटी झोपणारी भारती वर्षाला 10.93 कोटी रुपये कमावत आहे. 2019 च्या फोर्ब्सच्या यादीमध्ये भारती सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्टार्समध्ये 82 व्या स्थानावर आहे. सध्या आपण भारतीचे ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ सारखे रॉकिंग शो पाहत आहे.

ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगला अटक

कॉमेडियन भारती सिंगला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. त्याचवेळी तिचा नवरा हर्ष याच्याकडेही चौकशी केली जात आहे. यापूर्वी एनसीबीने भारतीसिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापा टाकला होता. छाप्यात एनसीबीला संशयास्पद पदार्थ (गांजा) सापडला. दुपारी तीन वाजेपासून सुरु असलेल्या चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली आहे.

Drug connection | कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्षला घेऊन NCBची टीम चौकशीसाठी रवाना

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *