Controversial Akshay Kumar’s Visit To Nashik, Minister Chhagan Bhujbal Orders Inquiry Orders See Also Order


नाशिक : अभिनेता अक्षयकुमारला नुकताच केलेला नाशिक दौरा महागात पडण्याची शक्यता आहे. एका खाजगी दौऱ्यांतर्गत अक्षयकुमार नाशिकला हेलिकॉप्टरने गेला होता. त्याने एक दिवस मुक्काम केल्याची देखील माहिती आहे. मात्र अक्षयकुमारच्या या दौऱ्याची आता चौकशी होणार आहे.

मंत्री छगन भुजबळांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरला हेलिपॅडसाठी परवानगी कोणी दिली? हॉटेल्स बंद असताना अक्षयसाठी रिसोर्ट उघडे कसे झाले? मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री गाडीतून फिरत असताना, अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. शहरात पोलिसांचा हद्दीचा वाद सुरू असताना ग्रामीण भागात शहर पोलिसांचे एसकोर्ट कसे ? असा सवाल देखील पालकमंत्री भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

 लॉकडाऊन दरम्यान अक्षय कुमारने मुंबईत केले जाहिरातीचे चित्रीकरण

नियम डावलून अक्षयकुमारला व्हीआयपी ट्रीटमेंटचा प्रकार धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटलंय. मंत्री भुजबळांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

अक्षय कुमार एक दिवस नाशिक मुक्कामी होता. खाजगी दौऱ्यानिमित्ताने नाशिकला अक्षय आल्यानं शहरात कुतूहलाचा विषय झाला होता. अक्षयच्या दौऱ्या बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अक्षयच्या येण्याचं कारण स्पष्ट झालं नसलं तरी काही वैद्यकीय कारणांनिमित्ताने आल्याची माहिती मिळत होती. नाशिकचे हवामान चांगले असल्यानं पुन्हा नाशिकला येण्याचा मानस अक्षयनं व्यक्त केला आहे. अक्षय मार्शल आर्टची अकॅडमी नशिकमध्ये भविष्यात सुरू करणार अशी चर्चा आहे.

Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *