Kangana Ranaut Replies To Jaya Bachchan Comments In Rajya Sabha Says Questions Stand If Abhishek Bachchan Committed Suicide

नवी दिल्ली : राज्यसभेच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी खासदार आणि अभिनेता यांचं नाव न घेता त्यांना खडे बोल सुनावले. तसेच इंडस्ट्रीला केंद्र सरकारच्या सुरक्षेची आणि समर्थनाची गरज आहे, असंही म्हणाल्या. तसेच त्यांनी रवी किशन यांना ‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’ , असं म्हणत अप्रत्यक्ष टोलाही लगावला. आता जया बच्चन आणि रवी शंकर यांच्या शाब्दिक युद्धात आता कंगना रनौतने उडी घेतली असून यासंदर्भात तिने जया बच्चन यांना त्यांची मुलगी श्वेता नंदा आणि मुलगा अभिषेक बच्चन यांची नावं घेत प्रश्न विचारले आहेत.

कंगना रनौत ट्वीटमध्ये म्हणाली की, ‘जया जी, माझ्या जागी तुमची मुलगी श्वेताला जर किशोरवयात कोणी मारहाण केली असती, तिला ड्रग्स दिले असते आणि तिच्यासोबत गैरवर्तणूक केली असती, तर तेव्हादेखील तुम्ही असंच म्हणाला असता का? तसंच अभिषेक सातत्याने छळ आणि गुंडगिरीचा त्रास होतोय अशी तक्रार करत असेल आणि एक दिवस तो अचानक फासावर लटकल्याचं दिसून आलं तर? आमच्यासाठीही सहानुभूती दाखवा.’

कंगना रनौतचं ट्वीट :

काय म्हणाले होते रवी किशन?

सोमवारी लोकसभेत बोलताना रवी किशन म्हणाले होते की, ‘भारतीय चित्रपट इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जची सवय वाढत आहे. अनेक लोकांना अटकही करण्यात आली आहे. एनसीबी चांगलं काम करत आहे. मी केंद्र सरकारकडे मागणी करत आहे की, त्यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करावी, दोषींना लवकरात लवकर पकडा आणि त्यांना शिक्षा द्या. ज्यामुळे शेजारील देशांच्या कारस्थानांचा अंत होईल.’

पाहा व्हिडीओ : जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है : जया बच्चन 

रवी किशन यांच्या वक्तव्यावर जया बच्चन यांचा हल्लाबोल

पावसाळी अधिवेशाच्या पहिल्या दिवशी गोरखपूरचे खासदार आणि अभिनेत रवी किशन यांनी संसदेत देश आणि बॉलिवूडमधील ड्रग्जच्या वाढता वापर आणि तस्करीचा मुद्दा मांडला होता. यावर आता खासदार जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली. जया बच्चन संसदेत बोलताना म्हणाल्या की, ‘चित्रपटसृष्टीत काम करणारे लोकसभेचे एक सदस्य काल इंडस्ट्रीविरोधात बोलत होते. हे अत्यंत लज्जास्पद आहे. मी कोणाचंही नाव घेत नाहीये. ते स्वतःही याच इंडस्ट्रीत काम करतात. जो लोग जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है. ही चुकीची गोष्ट आहे. मला आता सांगावं लागत आहे की, इंडस्ट्रीला सरकारच्या सुरक्षेची आणि समर्थनाची गरज आहे.’

‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’; नाव न घेता जया बच्चन यांचा रवी किशन यांच्यावर हल्लाबोल

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कडून अटक करण्यात आली आहे. कंगना रनौतने या ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी बॉलिवूडकरांवर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. त्यामुळे संपूर्ण बॉलिवूड विश्व ढवळून निघालं आहे. कंगना म्हणाली होती की, बॉलिवूडमध्ये 99 टक्के लोक ड्रग्ज घेतात. तसेच रियानेही एनसीबीला दिलेल्या जबाबात 25 बॉलिवूड सेलिब्रिटींची नाव घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यात सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु, सुशांत ड्रग्ज प्रकरणात सारा अली खानसह बॉलिवूडच्या 25 जणांची नावं हाती नसल्याची एनसीबीने दिली आहे. तसेच ड्रग्स खरेदी-विक्री करणाऱ्या 17 जणांना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *