Kangana Ranaut Tweet On Cm Uddhav Thackeray Share Controversial Memes

मुंबई : मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह मिम्स शेअर करत कंगना रनौतनं आता मराठीत ट्वीट केलं आहे. कंगनानं एक चित्र शेअर केलंय. ज्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई दिसत आहेत. यात राणी लक्ष्मीबाईंच्या रुपात कंगना दिसत आहे. तर या चित्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रावणाची उपमा दिली आहे. त्यात त्यांना दहा तोंडं दाखवली असून मागे जेसीबी दाखवला आहे.

विशेष म्हणजे कंगनानं हा ट्वीट मराठीत केला आहे. यात ती म्हणते, ‘लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र’ असं कंगनानं म्हटलं आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांकडून नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण, कंगना म्हणाली…

परवा शिवसेना कार्यकर्त्यांनी नौदलाच्या एका निवृत्त अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार काल घडला होता. यावरुन अभिनेत्री कंगना रनौतनं व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. याबाबत बोलताना कंगना म्हणाली होती की, महाराष्ट्रात सरकारचा आतंक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज शिवसेना कार्यकर्त्यांनी दिवसाढवळ्या सर्वांसमोर एका माजी सैनिकाला बेदम मारहाण केली. इतक्या लोकांनी एका माणसाला मारहाण केली. त्यांची चूक एवढीच होती की त्यांनी सरकारवर टीका केली, असं कंगनानं म्हटलं होतं.

खारच्या फ्लॅटवरुन कंगनाचं शरद पवारांकडे बोट, जितेंद्र आव्हाडांचं कंगनाला उत्तर

बीएमसीकडून कंगनाच्या कार्यालयाचं अनधिकृत बांधकाम तोडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला होता. तिनं काही वेळा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी करत देखील टीका केली आहे. ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा पाया रचला, तिच विचारधारा विकून शिवसेना सत्तेसाठी सोनिया सेना बनली आहे. ज्या गुंडांनी माझ्या नकळत माझं घर तोडलं, त्यांना स्थानिक प्रशासकीय संस्था म्हणू नका. संविधानाचा इतका अपमान करू नका,” असं कंगनानं म्हटलं होतं.

वडिलांच्या चांगल्या कर्मामुळं तुम्हाला धनदौलत तर मिळू शकते मात्र आदर तुम्हाला स्वत: कमवावा लागतो. माझं तोंड बंद कराल मात्र माझ्यानंतर शंभर जण तो आवाज लाखों लोकांपर्यंत पोहोचवतील. किती तोंडं तुम्ही बंद करणार? कुठवर सत्यापासून दूर पळणार. तुम्ही फक्त वंशवादाचं एक उदाहरण आहात, बाकी काही नाही, असं कंगनानं एकेरी भाषा वापरत ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंड टुटेगा; मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत कंगनाची टीका

आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंड टुटेगा

 “आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंड टुटेगा” असं कंगनाने म्हटलं होतं. कंगनाने एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटते फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझे घर पाडून मोठ बदला घेतला आहे. आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझा अहंकार तुटेल. हे काळाचे चक्र आहे, लक्षात ठेवा हे नेहमीच सारखं नसतं. मला वाटतं तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले आहेत. कारण काश्मिरी पंडितांसोबत काय घडलं हे मला आज कळलं. आज मी देशातील जनतेला वचन देतो की मी केवळ अयोध्येवरच नाही तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवणार आहे. आणि माझ्या देशवासियांना जागे करणार आहे. कारण जे माझ्याबाबतीत घडलं ते कुणासोबतही घडेल. उद्धव ठाकरे ही क्रुरता आणि दहशत माझ्यासोबत घडली हे चांगलं झालं. जय हिंद जय महाराष्ट्र, असं तिनं म्हटलं होतं.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *