Marathi Film Mulshi Pattern Guns Of North In Hindi Salman Khan Aayush Sharma

उपेंद्र लिमये यांनी मुळशी पॅटर्नमध्ये साकारलेला पोलीस ‘गन्स ऑफ नॉर्थ’मध्ये सलमान खान साकारण्याची शक्यता आहे.

तर प्रवीण तरडे यांनी साकारलेला डॉन कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.


मुंबई : प्रवीण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्नने धमाका केला. सिनेमा तुफान चालला. मुळशी भागात शेतजमिनी विकल्यानंतर उद्भवलेली विषण्ण करणारी गुन्हेगारी दुनिया या चित्रपटातून दिग्दर्शकाने मांडली. या सिनेमाची तुफान चर्चा झाली. यातलं आरारारार.. हे गाणंही गाजलं. ओम भूतकर, प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, मोहन जोशी, सविता मालपेकर आदींच्या यात भूमिका होत्या. हा सिनेमा मराठीसह अनेक अमराठी कलाकार, प्रेक्षकांनी पाहिला. त्यात होता सलमान खान. सलमानला हा सिनेमा खूप आवडला. मुळशी.. हिंदीत करायचा घाट त्याने घातला. आता तो बनणार आहे. या सिनेमाचं नाव निश्चित झालं असून, गन्स ऑफ नॉर्थ असं त्याचं नाव असेल, तर ओम भूतकरने साकारलेली भूमिका करेल सलमानच्या बहिणीचा, अर्पिता खानचा नवरा आयुष शर्मा.

‘तरडेचा वावर अन् ‘राधे’ला पावर!’, सलमानसोबत स्क्रिनवर झळकणार प्रवीण तरडे

या सिनेमाचं नाव आधी धाक असं ठेवण्यात आलं होतं. पण आता ते बदलण्यात आलं. सिनेमाची सगळी तयारी पूर्ण झाली असून, एप्रिलमध्ये सिनेमाचं चित्रिकरण सुरू होणार होतं. पण, लॉकडाऊनमुळे हा बेत रद्द करावा लागला. आता लॉकडाऊन उठल्यानंतर या सिनेमाच्या चित्रिकरणाला वेग येणार आहे. आयुष शर्माने यापूर्वी लव्हयात्री हा सिनेमा केला होता. वारिना खान ही नायिका त्याच्यासोबत होती. लव्हयात्री तिकीटबारीवर फार काही करू शकला नाही. या चित्रपटाने आयुषला हातही दिला नाही. म्हणूनच सलमान खानने आपल्या आयुषसाठी मुळशी पॅटर्नची निवड केली आहे. आता त्याला आयुष किती न्याय देतो ते पाहावं लागेल.

या सिनेमात सलमान खानही असणार आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार उपेंद्र लिमये यांनी साकारलेला पोलीस सलमान साकारण्याची शक्यता आहे. तर प्रवीण तरडे यांनी साकारलेला डॉन कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.  मुळशी पॅटर्नने महाराष्टात मिळवलेलं यश पाहता या सिनेमाकडून मराठी जनांना अनेक अपेक्षा आहेत. विशेष बाब म्हणजे प्रवीण तरडेही या सिनेमाच्या जडणघडणीमध्ये महत्वाच्या जबाबदारीवर असणार आहेत. पण ते नेमकी कोणती जबाबदारी स्वीकारतायत ते जाहीर करण्यात आलेलं नाही.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *