RSVP Movies Pays Tribute To Field Marshal Sam Manekshaw On His Death Anniversary


मुंबई : मागील वर्षी, जेव्हा फील्ड मार्शल सैम मानेकशॉ यांच्या भूमिकेतील विक्की कौशल याचा पहिला लुक समोर आला होता, आपण सगळेच स्तिमित झालो होतो. आणि आज या महान व्यक्तित्वाच्या पुण्यतिथिनिमित्त, त्यांना श्रद्धांजली वाहताना, त्यांच्या बायोपिकच्या निर्मात्यांनी विक्की कौशलचा आणखी एक लुक सादर केला आहे. जो स्क्रीनवर सैम मानेकशॉ यांची भूमिका निभावण्यासाठी सज्ज आहे.
विक्कीच्या या नव्या लुकने आपल्याला पुन्हा एकदा आश्चर्यचकित केले आहे. आरएसवीपी मूव्हीजने आपल्या सोशल मीडियावर फील्ड मार्शलला श्रद्धांजली वाहताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ते लिहितात, फील्ड मार्शल सैम मानेकशॉ यांच्या पुण्यतिथिनिमित्त त्यांचा अविश्वसनीय प्रवास तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी आता आम्ही वाट पाहू शकत नाही.

निर्माता रोनी स्क्रूवाला यांनी फील्ड मार्शल यांना आठवताना नवा लुक पोस्ट करताना देखील असचं लिहिलं आहे.

दिग्दर्शक गुलज़ार यांनी देखील त्यांच्या आठवणीत फील्ड मार्शल सैम मानेकशॉ यांच्या आदरयुक्त ट्विट लिहलं आहे.

अभिनेता विक्की कौशलने देखील आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहिलंय, की भारतातील उत्कृष्ट फील्ड मार्शल सैम मानेकशॉ यांचा प्रवास आता खास होणार आहे.

अभिनेता विक्की कौशल लवकरच मेघना गुलज़ारद्वारे दिग्दर्शित चरित्रपटात फील्ड मार्शल सैम मानेकशॉ यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करणार आहेत.

Mahesh Tilekar Nepotism | मराठी सिनेसृष्टीतही घराणेशाही, मक्तेदारी चालते : महेश टिळेकर

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *