Sushant Singh Rajput Sucide Lookalike Sachin Tiwaris Photos Goes Viral

मुंबई : सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे, असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही. अगदी मिनिटा-मिनिटाला सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर सचिन तिवारी नावाच्या तरूणाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांचं असं म्हणणं आहे की, सचिनचा चहेरा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्याशी अगदी मिळता जुळता आहे. फक्त चेहराच नाहीतर, या तरूणाची चालण्याची पद्धत आणि डान्स मूव्सही सुशांतशी मिळते जुळते असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.


काही लोक सचिनच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षावर करत आहेत. तर काही लोक सचिनला ट्रोलही करत आहेत. एवढचं नाहीतर इन्स्टाग्रामवर सचिनचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

एका युजरने सचिनच्या एका व्हिडीओवर कमेंट केली आहे की, ‘सचिन मी तुमचा मोठा फॅन आहे. कारण सुशांत माझा फेवरेट अॅक्टर होता.’

सचिनच्या आणखी एका व्हिडीओवर लाइक्सचा वर्षावर करण्यात येत आहे. ज्यामध्ये 2013मध्ये आलेल्या सुशांतच्या ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटातील गाण्यावर तो डान्स करत आहे. हा व्हिडीओ पाहून सचिनला एका युजरने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा सल्ला दिला आहे.

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या आत्महत्येबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. तसंच या प्रकरणात आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे. सोबतच त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर अनेक कलाकारांनी आपली भूमिका मांडली आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील आपल्या राहत्या घरी 14 जून रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या आत्महत्येबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. तसंच या प्रकरणात आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे. सोबतच त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर अनेक कलाकारांनी आपली भूमिका मांडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

सुशांत सिंह राजपूतच्या ‘दिल बेचारा’च्या ट्रेलरचा रेकॉर्ड; ‘एवेंजर्स एंडगेम’लाही टाकलं मागे

Dil Bechara Trailer | सुशांत सिंह राजपूतच्या ‘दिल बेचारा’चा ट्रेलर प्रदर्शित

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; आता गळफासाच्या कपड्याचा तपास

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ‘नेपोमीटर’च्या आधारे आलिया भट्ट हिचा ‘सड़क 2’ चित्रपट बॉयकॉट करण्याचं आवाहन

पोस्टमॉर्टमनंतर सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा रिपोर्टही आला; मृत्यूबाबत ‘हा’ खुलासा

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *